काझड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
माहेरहून हुंडा म्हणून पैसे घेऊन ये किंवा माहेरच्या संपत्तीमधील हिस्सा आणण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी संशयित आरोपी पती सुनील ज्ञानदेव नरुटे सासरे ज्ञानदेव भानुदास नरुटे, सासू संजबाई ज्ञानदेव नरुटे,दीर नानासो ज्ञानदेव नरुटे,जाऊ अश्विनी नानासो नरुटे व चुलत दीर महादेव तुकाराम नरुटे यांच्यावर वालचंदनगर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ४९८ (अ),३२३,५०४,५०६, (३४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय विवाहितीने फिर्याद दिली आहे.
याबाबत वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार,१४ डिसेंबर २०१० मध्ये तक्रारदार महिलेचा सुनील नरुटे यांच्याशी विवाह झाला.त्यानंतर पती,सासू सासरे यांनी वेळोवेळी माहेरहून हुंडा आणण्याची मागणी केली. पीडितेला मानसीक व शारीरिक त्रास देण्यास पतीने सुरुवात केली.तुला घरातील स्वयंपाक जमत नाही असे म्हणत,शिवीगाळ करुन मारहाण करीत असून, सासु मला तुझ्या सोबत माझ्या मुलाचे लग्न केल्याने त्याचे वाटोळे झाले असे म्हणत व सासरे हे सुद्धा मला तुझ्या घरच्यांनी लग्नामध्ये आमचा मानपान केला नाही.
तुमच्यामुळे लग्नामध्ये आम्हाला खाली बघायला लागले असे म्हणत घालून पाडून बोलत असे.तसेच माझे मोठे दिर व त्याची पत्नी हे दोघेसुद्धा घरातील कोणत्याही कारणावरून टोमणे मारत मानसिक त्रास देत होते.तसेच माहेरच्या तुझ्या वाटणीचा हीस्सा घे.तु जर तुझ्या घरच्यांना तुझ्या वाटणीचा हीस्सा मागीतला नाही तर तुला आम्ही घरातुन हाकलुन देवु नाहीतर सोडचिठ्ठी देईन.जर तुला हीस्सा घ्यायचा नसेल तर तु तुझ्या माहेरहुन पैसे व दागीने घेवुन ये अशी वारंवार मागणी केली.त्यावरून रात्री अपरात्री सासरे व पती यांनी लाथा बुक्कयांनी मारहाण करत घराबाहेर काढले.असे फिर्यादींनी फिर्यादीत महंटले आहे.याबाबत अधिक तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.
बातमी चौकट :
मला वारंवार माहेरच्या जमिनीतील हिस्सा घे अथवा माहेरहून पैसे घेऊन ये अन्यथा तुला नांदवणार नाही, त्यामुळे पोलिसांकडे तक्रार केली होती, त्यानुसार तानाजी नरुटे यांनी मध्यस्थी करून मला नांदवण्यास भाग पडल्याचे चित्र निर्माण करून घरी गेल्यावर हिला हाकलून द्या,नाहीतर मारून टाका आपले आमदार दत्तात्रय भरणे आपल्याला सोडवतील हिच्या आत्महत्येची केस करून मोकळे होऊ,आपल्याला काही होणार नाही.असा आरोप पीडित विवाहितेने केला आहे.