बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामतीमधील कसबा परिसरातील फारूक (चाचा) तांबोळी भाजी विक्रेते यांचा लक्ष्मी नारायणनगर कसबा १३ नोव्हेंबर रोजी शनिवारी एका मनोविकृत व्यक्तीच्या हल्यात मृत्यू झाला होता.त्यानंतर गरीब भाजी विक्रेते तांबोळी यांच्या तीन मोठ्या मुलींसह लहान मुलगा व पत्नी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला,एकमेव करता कामवता आधार अचानक सोडून गेला.परंतु समाजात आजही माणुसकी टिकून आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे या कुटुंबाच्या पाठीशी समस्त सर्व जागरुक मानवातादी नागरिक व समाज बांधव उभे राहिले.
फारूक यांची मोठी मुलगी तब्बसुम हिचा विवाह म्हस्कोबाची वाडी येथील मुलगा समीर याच्याशी ठरला. घरात करता माणूस नसल्याची उणीव जाणवत असताना अंजुमन इत्तेहाद जमात बारामती च्या वतीने लोक सहभागातून विवाह सोहळाचा सर्व खर्च उचलत हा विवाह पार पाडला.तसेच या विवाह सोहळ्यासाठी बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती शहर पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे यांनी उपस्थित राहुन दोन्ही दांपत्याना आशिर्वाद दिले.तसेच या विवाह सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड तांबोळी जमात अध्यक्ष ताज्जुदिन भाई तांबोळी यांनी वीस हजारांची मदत दिली.
तसेच तांबोळी जमातचे शहराध्यक्ष नजीरभाई धायरीवाले यांनी दुसऱ्या मुलीच्या शिक्षणासाठी पंचवीस हजार रुपये रोख मदत दिली.या सोहळ्यासाठी सर्व नियोजन पुढाकार घेऊन बारामती तांबोळी समाज अध्यक्ष मुनिर तांबोळी यांच्यासह कार्यकारिणी सदस्य जावेद तांबोळी,बशीर तांबोळी, अफजल तांबोळी,युसुफ तांबोळी इम्रान तांबोळी,अस्लम तांबोळी,जाहगींर तांबोळी,आरीफ तांबोळी तोसीब तांबोळी,अरबाज तांबोळी यांच्यासह ज्येष्ठ मार्गदर्शक मस्जिदभाई तांबोळी, कबीरभाई तांबोळी,रशिदभाई तांबोळी,राजुभाई तांबोळी, रमजान भाई तांबोळी यांच्यासह विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून परिश्रम घेऊन हा विवाह सोहळा पार पाडण्यास मदत केली.