दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
संभाजी ब्रिगेडची मराठा आरक्षण व मराठा ओबीसीकरण ही गेल्या पंचवीस वर्षांपासूनची मागणी आहे आणि संभाजी ब्रिगेड या मागणीवर ठाम आहे. तसेच,आगामी काळात संभाजी ब्रिगेड स्वतंत्र लढा उभा करणार आहे.वर्तमान परिस्थितीमध्ये खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकार समोर मराठा समाजाच्या प्रलंबीत मागण्या ठेऊन दि.२६ फेब्रुवारी पासून आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.या मागण्यादेखील मराठा समाजासाठी हीतकारक आहेत तरी देखील सरकार या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे म्हणून पुढील मागण्यांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ दि.२८ फेब्रुवारी रोजी राज्यभर धरणे आंदोलन करत आहोत.या आंदोलनात सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी आहेत.
मराठा आंदोलनातील प्रमुख मागण्या…
१) मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण ओबीसी आरक्षणाचे संरक्षण तसेच ओबीसी सह सर्व जातींची जातनिहाय जनगनणा करणे,
२) सारथी संस्थेला सक्षम निधी व सारथी संस्थेचे सक्षमीकरण करूण सर्व महसूल विभागानुसार सारथी कार्यालय सुरू करणे सारथी संस्थेवर कुणबी-मराठा समाजातील अभ्यासक व सामाजिक चळवळीचे प्रतिनिधी घेणे
३) आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला ५०० कोटींचा निधी देणे महामंडळाची कर्ज मर्यादा,महामंडळावर संचालकांच्या नियुक्त्या तात्काळ करणे
४)मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे तत्काळ मागे घेणे,सर्व जिल्ह्यात वसतीगृहे सुरू करणे ५) आरक्षण रद्द होण्याअगोदर मराठा समाजातील जे विद्यार्थी MPSC व ईतर निवड परीक्षा उत्तीर्ण झाले. आहेत त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने तत्काळ नियुक्त्या देणे..
६) कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा देवून पिडीत भगिनीला न्याय देणे..
७) छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक मुंबई येथे जमिनीवर ऊभे करणे..
या मागण्यांसाठी आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देऊन देवून पहिला टप्पा हा धरणे आंदोलन करण्यात येत आहे.त्यामुळे सरकारने या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून मराठा समाजाला न्याय द्यावा,अन्यथा पुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन होईल आणि त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी शासनाची राहील आशा प्रकारचे निवेदन संभाजी ब्रिगेडने दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांना दिले आहे.