Baramati News : बारामती शहर उपविभागाला पूर्णवेळ अतिरिक्त कार्यकारी अभियंता कधी मिळणार ? मनसेचा मुख्य अभियंता पावडे यांना सवाल..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती शहर उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांची बदली होऊन जवळपास एक वर्ष होत आले,परंतु तरीदेखील ही जागा अद्यापही रिक्त आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या गावात म्हणजेच बारामती शहर उपविभागाला पूर्णवेळ अति कार्यकारी अभियंता मिळू नये ही अत्यंत खेदजनक बाब आहे.मागील वर्षभरापासून सदरची जागा रिक्त आहे.आधीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते यांच्याकडेच तात्पुरत्या स्वरूपाचा पदभार आहे.

त्यामुळे या रिक्त जागेवर तात्काळ योग्य त्या सक्षम अशा अधिकाऱ्याची त्वरीत नेमणुक करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे.त्याचबरोबर,महाराष्ट्र शासनाचे बदली संदर्भातील नियम व अटी या काही ठराविकच अधिकाऱ्यांना लागु होतात का ? प्रकाश एकनाथ देवकाते हे सन २०१० पासून बारामती शहर उपविभागामध्ये कार्यरत आहेत. व उपकार्यकारी अभियंता बारामती ग्रामीण या पदावर धनंजय गावडे हे अधिकारी जवळपास २०१२ पासून बारामती ग्रामीण उपविभागामध्ये कार्यरत आहेत.

त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या जवळपास मागील दहा वर्षापासुनच्या एकुणच बदली प्रक्रियेबद्दल लेखी स्वरूपाच्या खुलास्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी केली आहे.तसेच बदली संदर्भातील नियम व अटी यातील पळवाटा शोधून नियमबाहय पध्दतीने विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या इतर अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील कारवाई करण्याची मागणी मनसेने केली आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष ॲड.निलेश वाबळे बारामती शहर उपाध्यक्ष स्वप्नील मोरे,अमोल गालिंदे,प्रवीण धनराळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *