फलटण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
फलटण तालुक्यातील गुणवरे गावात चक्री जुगार अड्डा चालवणाऱ्या संशयित आरोपी सागर विठ्ठल जाधव ( रा.गुणवरे, ता.फलटण ) रोहित पवार ( पूर्ण नाव माहीत नाही ) ( रा.फलटण, ता.फलटण ) प्रशांत प्रकाश लंगुटे, वय.३१ वर्षे ( रा.बरड,ता. फलटण ) व इतर अनोळखी इसम नाव,गाव,पत्ता माहीत नाही हे बेकायदा लोकांकडून पैसे घेऊन कॉम्प्युटरच्या सहाय्याने घेत असताना त्यांना ताब्यात घेतले असून,त्यांच्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियम ४,५,१२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फलटण तालुक्यातील गुणवरे गावच्या हद्दीत सागर जाधव हा आपल्या मालकीच्या जागेत असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये चक्री मटका जुगार चालवत असल्याची माहिती मिळाली असता,सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस निरीक्षक गोडसे यांच्या आदेशानुसार,एक पथक तयार करून त्याठिकाणी छापा टाकला असता,त्याठिकाणी पाच ते सात जण चक्री जुगार खेळताना मिळून आले.त्यातील एक जण कागदावरच आकडे घेतला मिळून आला.त्यांना ताब्यात घेत असताना,त्यांचा ताब्यात असलेले १ लाख २७ हजार ७०० किंमतीचे जुगाराचे साहित्य व ७६० रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
ही कामगिरी सातारा पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे,फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे,सहाय्यक पोलीस फौजदार सुर्यवंशी,पोलीस हवालदार साबळे,कर्णे,पोलीस कर्मचारी अवघडे यांनी केलेली आहे.