Indapur Crime : व्याजाच्या पैशासाठी मातंग समाजातील युवकाला मारहाण करणाऱ्या खासगी सावकारावर इंदापूर पोलीस ठाण्यात अट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल….!!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

इंदापूर तालुक्यातील रेडा येथील मातंग समाजातील तरुणाला व्याजाच्या पैशासाठी जातीवाचक शिवीगाळ करत लोखंडी रोडने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी संशयित आरोपी विक्रम अरविंद देवकर ( रा. रेडा,ता.इंदापूर,जि.पुणे ) याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३०७,३२३,५०४,५०६ अनुसूचित जाती जमाती ( अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम १९८९ चे कलम ३ (२),(va),३(२) नागरी हक्क व संरक्षण अधिनियम १९५५ चे कलम ७(१) (d) तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९,४१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोमनाथ सिताराम मोरे,वय.२६ वर्षे ( रा. रेडा,ता.इंदापूर,जि.पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार,इंदापूर तालुक्यातील रेडा या गावातील फिर्यादींनी खासगी सावकार विक्रम देवकर याच्याकडून भावाच्या उपचारासाठी तीस हजार रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते,त्याप्रमाणे दोन महिने ३००० व्याज सुद्धा दिले होते. जानेवारी महिन्यांमध्ये फिर्यादीकडे पैसे नसल्याने,आठ ते दहा दिवसांनी व्याजाचे पैसे देतो असे सांगितले असता, संशयित आरोपींनी मला काही कारण सांगू नकोस, व्याजाचे पैसे आजचे आज देऊन टाक.त्यानंतर २५ जानेवारीला सायंकाळी ७.०० च्या सुमारास फिर्यादींच्या घरी येऊन व्याजाच्या दोन महिन्यांच्या पैशाची मागणी केली असता,फिर्यादींनी दोन दिवसांत पैसे देऊन टाकतो असे म्हटंल्यावर,मी काय हेलपाटे मारायला तुझ्या घरचा नोकर आहे काय ?

असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत लोखंडी रॉड फिर्यादींच्या डोक्यात मारत आज तुला सोडतच नाय मारूनच टाकतो असे म्हणत पुन्हा रॉडने मारण्यास सुरुवात केली असता,फिर्यादींचा भाऊ व आत्या यांनी आरोपींच्या हातातून रॉड हिसकावून घेतला.त्यांनतर आरोपींने फिर्यादींच्या भावाला व आत्याला देखील लाथाबुक्यांनी मारहाण करत,तुम्हाला गावात राहु देणार नाही असे म्हणंत जातीवाचक शिवीगाळ केली आणि फिर्यादींना दगड फेकून मारला.दगड लागल्याने मोरे यांच्या डोक्यातुन रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना इंदापुर येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले असून,आत्या तायडाबाई यांच्यावर देखील इंदापुर येथील सरकारी दवाखान्यात उपचार चालु आहेत.असे फिर्यादीने फिर्यादीत म्हंटले आहे.याबाबत अधिक तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *