गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट..पीडितेला पोलीस प्रशासन न्याय देणार का ?
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
प्रेम असल्याचे नाटक करून लग्न करणार असल्याचे आमिष दाखवत पुण्यातील लॉजवर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करत,जर दुसरीकडे लग्न जमवायचा प्रयत्न केला तर तुझे लग्न होऊन देणार नाही अशी धमकी देत पीडितेच्या नातेवाईकांमध्ये बदनामी करण्यास सुरुवात केलेल्या बारामतीतील खंडोबानगर परिसरातील हॉटेल व्यवसायिकावर व त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर पीडितेची बदनामी केल्याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३५४,३७६ (२),(n), ५०४,५०९, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी २४ वर्षीय पीडीतीने फिर्याद दिली आहे.
याबाबत खडकी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती नुसार,पीडित युवती ही पुण्यात हॉटेल चालवत असताना, डिसेंबर २०१८ मध्ये फेसबुकवरून तिची ओळख बारामतीतील खंडोबानगर परिसरातील एका २४ वर्षीय युवकाशी झाली.त्यावेळी हा युवक पुण्यातील एका हॉटेलमध्ये नोकरी करत होता.या पीडित युवतीचा देखील बारामती मध्ये हॉटेल व्यवसाय सुरू होता,याचाच फायदा घेत आरोपी हा काही ना काही कारणे काढून युवती बरोबर फोनवर बोलत असायचा आणि काही वेळी पुण्यातून या पीडितेला भेटण्यासाठी बारामतीला येत असे.वारंवार भेटणे होत असल्याने फेब्रुवारी २०१९ ला आरोपीने युवतीला प्रेम असल्याचे सांगितले.मात्र युवतीने त्यास नकार दिला.
असे असताना देखील संशयित आरोपी हा वारंवार या युवतीला भेटण्यासाठी येत असे व लग्नाची मागणी घालत असे.लग्नाची वारंवार मागणी घातल्याने या युवतीने अखेर प्रेमाला होकार दिला.अशातच ११ मार्च २०१९ ला पिडीत युवतीच्या मैत्रिणीचे लग्न असल्याने पुण्यात गेली असता, संशयित आरोपीने युवतीला आपल्या रूमवर घेऊन जात तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले.त्यानंतर देखील लग्नाचे आमिष दाखवत बारामती मधील यशवंत लॉजवर नेत वारंवार शारीरिक संबंध करत असे,असे असताना दोघांच्या कुटुंबातील लोकांना समजले असता,दोन्ही कुटूंबांनी लोकांनी लग्नाला सहमती दर्शवली.मात्र जानेवारी २०२० पासून आरोपीने युवतीला टाळण्यास सुरुवात केली,व आरोपीला लग्नासाठी मुली पाहणे चालू केले.
हा प्रकार युवतीच्या लक्षात आल्यावर ती आरोपीच्या घरच्यांना भेटली असता,त्यांनी तिला शिवीगाळ करत आमच्या मुलाशी संपर्क ठेवू नकोस असे धमकावले. फेब्रुवारी २०२० मध्ये माझ्या कुटुंबातील लोकांनी त्या युवकाला भेटण्यासाठी बोलावले असता तो भेटायला आला नसल्याने त्याने आपली फसवणुक केल्याचे युवतीच्या लक्षात आले.एप्रिल २०२० मध्ये लॉकडाऊन मध्ये या संशयित आरोपीचा जॉब गेल्याने त्याने युवतीला पुन्हा संपर्क साधण्यास सुरुवात केली.जुने सर्व विसरून त्या युवतीने त्याच्याबरोबर बोलण्यास सुरुवात केली. आरोपी हा आर्थिक अडचणीत असल्याने युवतीने त्याला खंडोबानगर परिसरात हॉटेल सुरुवात करण्यासाठी आर्थिक मदत देखील केली.
त्यानंतर आरोपीच्या आई वडिलांनी जुन्या भांडणाचे कारण काढून लग्नास नकार दिला. त्यामुळे पीडित युवतीच्या कुटुंबाने तिचे दुसरीकडे लग्न जमवण्यास सुरुवात केली असता,आरोपीने व त्याच्या आई वडिलांनी युवतीची तिच्या नातेवाईकांमध्ये बदनामी करण्यास सुरुवात केली.जानेवारी २०२२ रोजी आरोपीने युवतीला धमकी देत,मी ही तुझ्यासोबत लग्न करणार नाही,आणि तुझे लग्न कुठेही होऊन देणार नाही अशी धमकी दिली.तू जर दुसरीकडे लग्न करण्याचा प्रयत्न केला तर,तुझे व माझे खाजगी फोटो व्हायरल करेन अशे म्हणत युवती सोबत वारंवार शारीरिक संबंध केले.आरोपीच्या व त्याच्या आई वडिलांच्या त्रासाला कंटाळुन व मला वारंवार ब्लॅकमेलिंग करून माझ्याबरोबर शारीरिक संबंध करून मानसिक व शारीरिक त्रास झाल्याने मी फिर्याद दिली आहे.असे फिर्यादीत फिर्यादीने महंटले आहे. याबाबत आधीक तपास खडकी पोलीस करीत आहेत.
क्रमशः : आरोपी मोकाट असून,पीडितेच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुन्हा दाखल असूनही हा आरोपी पीडित युवतीला कॉल करुन अश्लील भाषेत शिवीगाळ करत असून. लवकरच हे ऑडिओ देखील पोलिसांकडे देणार आहे. यामुळे आता या पीडितेला पोलीस प्रशासन न्याय देणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.