बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने बारामती तालुक्यात सात जिल्हापरिषद गट अस्तित्वात आले आहेत,त्यामध्ये निरावागज-डोर्लेवाडी गटामध्ये निरावागज,खांडज,मेखळी डोर्लेवाडी,सोनगाव झारगडवाडी,ढेकळवाडी या गावांचा समावेश आहे.या गटामध्ये मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.या मतदार संघामध्ये अनेकांनी संपर्क वाढवला आहे,त्यामध्ये निरावागज गावचे भाजपच्या प्रदेश पातळीवर काम पाहणारे युवा नेतृत्व अभिजीत देवकाते यांनी या गटामध्ये मोठा जनसंपर्क वाढवला आहे.
लग्नसमारंभ तसेच युवकांचे वाढदिवस,तसेच अनेक लोकांच्या अडीअडचणी सोडविणे,या माध्यमातून लोकांशी संपर्क वाढवला आहे.युवकांच्या अडी अडचणीला धावून जाणारा आणि मदत करणारा युवा कार्यकर्ता म्हणून त्यांची युवकांमध्ये मोठी क्रेझ आहे,व तरुणांची मोठी फौज त्यांच्या मागे उभी आहे. २०१४ सालापासून त्यांचे काम सुरू आहे,त्यामुळे या गटामध्ये सत्ताधारी पक्षाची मोठी डोकेदुखी वाढणार आहे हे मात्र नक्की ? ?
२०१४ पासून या युवा नेतृत्वाने जिल्हा परीषद गटातील प्रत्येक गांवा-गावामधे घराघरामधे संपर्क..
आजपर्यंत गटातील विविध गावांमध्ये सामाजिक उपक्रम राबवले असून,यामध्ये वृक्षारोपण,स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर,आरोग्य शिबीर,नेत्र तपासणी शिबिर, गोरगरीब लोकांना वेळोवेळी मदत,साड्या वाटप, कोरोनाच्या काळात कोरोनाग्रस्तांना व त्यांच्या परिवाराला मदत कार्य,वारकरी संप्रदायासाठी किर्तन सोहळा,व सप्ताह सोहळ्यात फराळ वाटपाचा कार्येक्रम इत्यादि सामाजिक कामे केली असून,युवकांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी कायम सक्रिय असल्याने अभिजित देवकाते यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर युवकांचा मोठा जनसंपर्क आहे.सर्वसामान्य कुटुंबातील एक लढवय्या तरूण फक्त धनगर समाजच नाहीतर सर्व जाती धर्मातील लोकांना आपलासा वाटणारा हक्काचा माणूस अशी प्रतिमा असलेला युवा कार्यकर्ता,प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी,युवकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध असणारा जपणारा तसेच मेखळी,झारगडवाडी, सोनगाव,ढेकळवाडी,निरावागज गावांमध्ये नाते-संबध व तगडी पक्कड असणारा आणि स्वाभिमानी नेतृत्व असलेला,चूक त्याला चुकच आणि बरोबर त्याला बरोबर असा स्वभाव मुख्य म्हणजे गटातील गावांच्या व गावागावातील प्रत्येक तरूणांच्या प्रगतीसाठी डोक्यात मोठे व्हिजन असलेला उच्चशिक्षित असा उमेदवार मेकॅनिकल डिप्लोमा इंजिनिअर केलेला युवक.
बारामती तालुक्यात अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे आयोजन व यामुळे संपूर्ण बारामती तालुक्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर धनगर समाजामध्ये लोकप्रिय नेतृत्व स्थानिक स्वराज्य संस्था,सहकारी साखर कारखाने जिल्हा परिषद,पंचायत समिती,विधानसभा,लोकसभा अशा अनेक निवडणूकच्या प्रचारात सक्रिय सहभागी असणारा,भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा,महाराष्ट्र प्रदेश सचिव व भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी काम अशा या धडाकेबाज युवा नेतृत्वामुळे यावेळच्या निरावागज – डोर्लेवाडी या जिल्हा परिषद गटांमध्ये निवडणूक ही काटे की टक्कर होणार हे देखील तितकंच सत्य आहे ….