Breaking News : राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना फोन टॅप प्रकरण भोवले ; अखेर पुण्यात गुन्हा दाखल..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बेकायदेशीरपणे टेलिफोन टॅपिंग केल्याप्रकरणी न्यायालयात वाद सुरु असतानाच पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राज्य गुप्ता वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त डॉ.रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे कार्यरत आहेत.याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पाडे यांची
समिती नियुक्त करण्यात आली होती.या समितीने राज्यशासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रश्मी शुक्ला यांनी शासनाची दिशाभूल करून काही खासगी व्यक्तींचे फोन टॅप केले.त्यांची ही कृती भारतीय टेलिफोन अॅक्टचा गैरवापर करणारी आणि संबंधित व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे.असा गंभीर ठपका तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी
चौकशी अहवालात ठेवला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा संदर्भ देऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता.इंडियन टेलिग्राम अॅक्टनुसार राजकीय मतभेद,व्यावसायिक,कौटुंबिक कलह अशा प्रसंगांमध्ये फोन टॅपिंग करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्यासारखे होते.मात्र या प्रकरणात उद्देशापेक्षा वेगळ्या प्रयोजनासाठी या तरतुदीचा गैरवापर करून शासनाची दिशाभूल केल्याचे दिसते.ही बाब गंभीर असल्याने या फोन टॅपिंग बद्दल रश्मी शुक्ला यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *