निरावागज : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
ग्रामीण भागात व्यवसाय करणे म्हणजे तारेवरची कसरत असून बारामती तालुक्यातील निरावागज गावातील तरुण रणजीत भानुदास धायगुडे याने बारामती येथील इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले असून,त्यांनी भाग्यलक्ष्मी अग्रो फुड प्रोसेसिंग कंपनीची स्थापना केलेली आहे. यामध्ये गहू,ज्वारी,बाजरी,मका,सोयाबीन,उडीद व इतर सर्व धान्य स्वच्छ केले जातात.या कंपनीचा गुणवत्तेचा आलेख उत्तराधार खूप वाढला असून ग्रामीण भाग व शहरी भाग मुंबई एक्सपोर्ट माल याची चर्चा होत आहे.
मशिनरीची क्वालिटी,गुणवत्तेमुळे शेतकऱ्यांचा माल स्वच्छ व तसेच त्या धान्याला चांगला भाव मिळत आहे.त्यामुळे एका ग्रामीण भागातील कंपनीला लोकांचे चांगले सहकार्य मिळत आहे. रणजीत भानुदास धायगुडे यांचा प्रामाणिकपणा,चिकाटी आणि जिद्द मालाची गुणवत्तेमुळे कंपनीच्या मालाला परदेशातून मागणी होत आहे.एका ग्रामीण भागात उद्योजक घडताना दिसत आहे.कंपनीची वैशिष्ट्ये म्हणजे फास्ट सर्विस,सुपर क्वालिटी, शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री होत आहे.