फलटण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
फलटण येथील बंधन बँकेच्या हफत्यांचे झालेले कलेक्शन अलगुडेवाडी हुन गोखळी गावच्या दिशेने जात असताना मोटार सायकलींवरुन आलेल्या चौघा जणांनी पाठलाग करुन खटके वस्तीजवळ डोळ्यात चटणीची पुड टाकत तब्बल ७३ हजार ७६४ रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेल्याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३९४,३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.याप्रकरणी बंधन बँकेचे रिलेशनशिप ऑफिसर समाधान भिमराव वजाळे,वय.२३ वर्षे सध्या रा.स्वामी विवेकानंद नगर,बीएसएनएल ऑफिस समोर,बंधन बँक रेसिडन्सी,फलटण,जि.सातारा ) मुळ रा. माळीनगर,अकलुज,ता.माळशिरस, जि.सोलापूर ) यांनी फिर्याद दिली होती.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फलटण येथील बंधन बँकेचे हफत्यांचे गोळा झालेले कलेक्शन अलगुडेवाडी हुन गोखळी गावच्या दिशेने जात असताना दोन टू व्हीलर आलेल्या चौघाजणांनी पाठलाग करुन खटके वस्तीजवळील चव्हाण पाटी येथे गाठुन डोळ्यात चटणीची पुड टाकुन तब्बल ७३ हजार ४६५ रूपयांची रोख रक्कम चोरून चोरुन नेल्याबाबत बंधन बँकेचे रिलेशनशिप ऑफिसर समाधान वजाळे यानी फिर्याद दिली होती,त्या अनुषंगाने तपास करीत असताना,तक्रारदार वजाळे यांनी दाखविलेल्या घटनास्थळाला भेट देत,त्यादृष्टीने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरु केला.त्यामध्ये वजाळे यांनी चोरट्यांनी त्यांचा तीन किलोमीटर पर्यंत पाठलाग केल्याचे तक्रारीत सांगितले होते,परंतु त्यांच्या गाडीला आरसे नसल्याचे दिसून आले.यावरुन वजाळे काहीतरी लपवत असल्याचा पोलिसांना संशय आल्याने वजाळे याच्याकडे विचारपूस केली असता,तो उलटसुलट माहिती सांगु लागला.
त्यावेळी त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली देत बँकेच्या गोळा केलेल्या कर्जाच्या ७३,४६५ रुपये हडप करण्याच्या दृष्टीने त्याचा मित्र महंम्मद हमीद नदीफ मोमीन,वय.२२ वर्षे (रा.कांती गल्ली,अकलुज,ता. माळशिरस,जि.सोलापूर ) याला फलटणमध्ये बोलावून घेत दोघांनी दरोड्याचा बनाव करत महंम्मद मोमीन हा पैसे घेऊन गेल्यानंतर वजाळे याने जवळच्याच एका गावातील किराणा दुकानातून चटणीची पुड विकत घेऊन ती स्वतःच्या डोळ्यावर टाकत,बनाव करुन फलटण ग्रामीण पोलीस ठाणेस खोटी तक्रार दिली आहे.या गुन्ह्यातील त्यांचा साथीदार असलेल्या महंम्मद मोमीन यास अटक करण्यात आली असून त्यांच्याकडुन गुन्ह्यातील वापरलेले दोन मोबाईल व मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे करीत आहेत.
ही कामगिरी सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे,दत्तात्रय दराडे,पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस हवालदार दादासो यादव, मोहन काळे,शोभाताई खाडे, उर्मिला पेंदाम,पोलीस नाईक वैभव सूर्यवंशी,अमोल जगदाळे, रुपाली भिसे व गणेश अवघडे यांनी केली आहे.