शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी,पीडित्यांच्या समर्थनार्थ रस्त्यांवर न उतरणारे देशद्रोही कृत्य करणाऱ्या नेत्यांच्या समर्थनार्थ उभे राहणाऱ्यांमध्ये इतका निर्लज्जपणा येतो कुठून ? भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांचा सरकारवर हल्लाबोल..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक यांना ईडीने ८ तासांच्या चौकशीनंतर बुधवारी दुपारी अटक केली. आणि महाविकास आघाडीतील नेते त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करत आहेत.या पाश्र्वभूमीवर राज्यभरातून तीव्र पडसाद उमटत आहेत.भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी देखील खरपूस भाषेत महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.अतिशय चुकीचा संदेश आज महाराष्ट्रातील राजकारणात देण्यात येत आहे. ज्या नेत्याचा दहशतवाद्यांशी संबंध आला,

त्याच नेत्यांच्या समर्थनात आज मंत्री रस्त्यावर उतरले आहेत. काय म्हणावं यांच्या ढोंगीपणाला ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.शेतकऱ्यांना आलेली वाढीव वीजबिले, काही महिन्यांपासून सुरू असलेला वीज कनेक्शन कापण्याच्या अमानुष प्रकाराकडे या सरकारने डोळेझाकपणा केला.सामान्य शेतकरी,गरीब जनतेवर झालेल्या अन्यायचा यांना कधी कळवळा आला नाही. मात्र लोकांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या नेत्यांचा यांना पुळका आहे, असे म्हणत काळे यांनी या कृतीला विरोध केला.हे नेते कधी शेतकऱ्यांच्या समस्या मग पिकविमा, एफआरपी व पीडित महिलांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले दिसले नाही.

परंतु भ्रष्ट व देशद्रोही कृत्य करणाऱ्या नेत्याच्या पाठिंब्याच्या समर्थनार्थ छातीठोकपणे उभे राहतात. इतका निर्लज्जपणा येतो कुठून? असा सवाल त्यांनी केला.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या या राज्यात हे सरकार अतिशय लाज आणणारे कृत्य करत आहे. ज्या महाराजांनी चुकीला चूक म्हणत आपल्या आप्तेष्टांना देखील माफी दिली नाही. त्या राज्यात खुलेआम भ्रष्ट व्यवहाराला पाठींबा दिला जातोय. असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *