बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
महाराष्ट्र शासन कृषि विभाग, बारामती यांच्या मार्फत मळद येथे हरभरा काढणी पश्चात व्यवस्थापन व उन्हाळी सोयाबीन पीक लागवड व्यवस्थापन कार्यक्रम पार पडला.यावेळी तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी खपली गहू लागवड, व्यवस्थापन व खपली गव्हाचे पोषणमूल्य याबाबत मार्गदर्शन केले.आघारकर संशोधन केंद्राचे अध्यक्ष डी. एस. साळुंके यांनी हरभरा काढणी पश्चात व्यवस्थापन व बाजार भावबाबत सखोल मार्गदर्शन केले.
तर उन्हाळी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याबाबत चे मार्गदर्शन एस जायभाय यांनी केले.बळीराम फार्मर्स प्रोड्युसर कंपनी चे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी त्यांचे सोयाबीन बीजोत्पादनातील स्वंअनुभवाविषयी शेतकरी बांधवांशी चर्चा केली.ई-पीक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे.२८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईल अँप द्वारे पीक नोंदणी करून घ्यावी,असे आवाहन मंडळ कृषि अधिकारी चंद्रकांत मासाळ यांनी केले.
यावेळी शेतकरी बांधवांना केले.कार्यक्रमास तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल,मंडळ कृषि अधिकारी चंद्रकांत मासाळ, आघारकर संशोधन केंद्र होळचे शास्त्रज्ञ डी.एस.साळुंके,संतोष जायभाय, बळीराम फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, नानासाहेब गावडे, गावातील प्रगतिशील शेतकरी, कृषि सहायक मनीषा काजळे आदी उपस्थित होते.