मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
महाविकास आघाडी सरकार मधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर आता त्यांना ३ मार्चपर्यंत म्हणजे नऊ दिवसांची ईडीची कस्टडी देण्याचा निर्णय सत्र न्यायालयाने दिला आहे.मनी लॉंड्रिंग प्रकरणी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे.त्यानंतर या प्रकरणात सत्र न्यायालयात हा निर्णय दिला आहे.हे प्रकरण अंडरवर्ल्डशी संबंधित आहे.
मनी लॉंड्रिंगशी संबंधित आहे त्यामुळे याप्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी ईडीची कस्टडी मिळावी अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती.हे प्रकरण अंडरवर्ल्डशी संबंधित आहे,मनी लॉंड्रिंगशी संबंधित आहे त्यामुळे या प्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी ईडीची कस्टडी मिळावी अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती.