Crime Breaking : माळेगावात दिवसा ढवळ्या घरफोडी ; घरफोडीत तब्बल ८ लाख ८३ हजारांचे सोन्याचे दागिने गेले चोरीला..!!


माळेगाव : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील माळेगाव येथे भरदिवसा घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह तब्बल ८ लाख ८३ हजारांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना माळेगावातील अमरसिंह कॉलनी येथे दुपारी घडली असून, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी फिर्यादी विनोद दत्तात्रय चांडवले,वय.३० वर्षे, ( फ्लॅट नं. ७,झगडे रेसिडेन्सी,अमरसिंह कॉलनी माळेगाव ता. बारामती ) यांनी फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्यांवर तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ४५४,४५७,३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनोद चांडवले हे फ्लॅट बंद करून नातेवाईकांच्या कार्यक्रमाला गेले होते.अज्ञात
चोरट्यांनी बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून रोख ७ हजार रक्कमेसह ८ लाख ८३ हजार ९०० रुपयांचे दागिने चोरीला गेले असून,यामध्ये साडेतीन तोळ्यांचा नेकलेस अंदाजे १ लाख ६४ हजार ५०० किंमतीचा,पाच तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या २ लाख ३५ हजार किंमतीचा,१ लाख ४१ हजारांची तीन तोळ्यांची मोहन माळ,९४ हजार किंमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण,४७ हजार किंमतीची सोन्याची चेन, २८ हजार २०० किंमतीच्या चेन, ४७ हजार किंमतीच्या एक चेन व एक अंगठी,३० हजार किंमतीचे चांदीचे ताम्हण,फुलपात्र, करंडा, गणपती तसेच १५ हजार किंमतीचे चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरीस गेलेला आहे.या चोरीचा तपास माळेगावचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल घुगे हे करीत आहेत.दरम्यान सदर घरफोडीची खबर मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना सुचना केल्या.तसेच पुणे येथून फिंगरप्रिंट टीमला देखील पाचारण करण्यात आले आहे.हे चोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *