मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकले आहेत.सध्या मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.नवाब मलिक यांच्या घरी सकाळी साडे सहा वाजता ईडीचे अधिकारी धडकले आहेत.
त्याचे अंडरवर्ल्डशी संबंध असण्याची शक्यता असल्याने ईडीने घरात काही तपासणी केल्याची माहिती देखील मिळत आहे.याआधी अंडरवरल्डशी संबंधित इक्बाल कासकर तसेच अन्य काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या खात्यात काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती ईडीकडे असल्याचं समोर आलं आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित काही व्यक्ती आणि खात्यांमधून मलिक यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संबंध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.