Social News : अन्यथा लक्षात ठेवा गाठ ३ कोटी धनगर समाजाशी आणि माझ्याशी आहे -आमदार गोपीचंद पडळकरांचा महाविकास आघाडीला इशारा..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

भाजपकडून गोपीचंद पडळकरांना आमदारकी मिळाल्यापासून ते नेहमी आपल्या समाजाच्या मागण्यासाठी सत्तेत असलेल्या नेत्यांना टार्गेट करीत असल्याचे पाहायला मिळाले आहे.तसेच त्यांनी ७० वर्षे सत्तेत असलेल्या प्रस्तापितांनी राजकारणासाठी धनगर समाजाची कोंडी केली असल्याचे सांगत काँग्रेससह इतर पक्षांवरती टीका केली आहे.मागच्या पाच वर्षात ज्यावेळी भाजपाचं सरकार सत्तेतं होतं.त्यावेळी त्यांनी धनगर समाज्याचे हिताचे अनेक निर्णय घेतले.

तसेच त्यांनी सुरू जनहिताच्या अनेक योजना सध्याचं सरकार बंद करीत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. तसेच सध्याचं सरकार ३ कोटी धनगर समाजाच्या तोंडावर बोळा फिरवण्याचं काम करतंय असं म्हणून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. फडणवीस सरकारनं धनगर समाजासाठी २२ कल्याणकारी योजना व एक हजार कोटी निधी दिला होता.प्रस्थापितांचं सरकार आलं आणि योजना गुंडाळण्यात आल्या.आज माझ्या समाजाचा वापर प्रस्थापितांच्या सतरंज्या उचलण्यासाठी व्हावा,अशी काही घराण्यांची इच्छा आहे.

मात्र लक्षात ठेवा गाठ आमच्याशी आहे.कोरोनाच्या काळात धनगर समाज आर्थिकदृष्ट्या अत्यंत खचला असल्याचं चित्र आहे. परंतु त्या समाज्याचं राज्य सरकारला काहीचं देण घेण नसल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यापासून गावागावात हल्ले, विस्तापितांना टाचेखाली चिरड्याचे प्रकार पुन्हा एकदा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहेत.राज्य सरकारला माझं एकचं सांगणं आहे की,माझ्या धनगर समाज्याला जो पुर्वी निधी दिला जात होता.त्याची पुन्हा पूर्तता करावी अन्यथा लक्षात ठेवा गाठ ३ कोटी धगनर बांधवांशी तुमची गाठ आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *