बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती नगरपालिका हद्दीमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढलेला असून बऱ्याच नागरिकांना या गोष्टीचा मनस्ताप झालेला आहे. मोकाट कुत्र्याने एखाद्या नागरिकास इजा पोहोचवल्यास त्याचा गंभीर परिणाम होणार नाही यासाठीच सर्व मोकाट कुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधनात्मक लसीकरण करण्याची मोहीम सुरू केली आहे.
याबाबत सविस्तर बातमी अशी की, दिनांक २० फेब्रुवारी रोजी बारामती शहरातील विविध भागातील मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना मोफत रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम कै नामदेवराव नालंदे प्रतिष्ठान तर्फे राबविण्यात आली आहे. या मोहिमेत पहिल्या दिवशी १०० कुत्र्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.बारामती शहरातील टि.सी.कॉलेज परिसर,अवधूत नगर,व्हील कॉलनी,चंद्रविजय सोसायटी,सद्गुरूनगर, महादेव मळा, जामदार रोड,रेल्वे स्टेशन परिसर, अशोक नगर पासुन विद्या प्रतिष्ठानच्या संपूर्ण परिसरातील जवळपास शंभर हुन अधिक कुत्र्यांना रेबीज लसीकरण करण्यात आले .
या मोहिमेचे आयोजन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ.प्रशांत नालंदे यांनी केले होते.या लसीकरण मोहीमेसाठी डॉ.दत्तात्रय भरणे, डॉ.प्रशांत साळवे,डॉ.प्रविण जगताप, डॉ.परमेश्वर व्यवहारे,रणजित शेरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच रेस्क्यु टिम बारामतीचे श्रेयस कांबळे,अक्षय गांधी,केतन झगडे,सुश्रुत कुलकर्णी,सचिन जानराव,प्राची आगवने,हर्षदा सुतार,भक्ती स्वामी अमोल पवार यांचे मोलाची मदत लाभली आहे.