Social Breaking : कर्मयोगी सुभाष आण्णा कुल प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी शितोळे यांची बिनविरोध निवड…


दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

कर्मयोगी सुभाष अण्णा कुल प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली.अध्यक्षपदी शिक्षक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते,संचालक रवींद्र जनार्दन शितोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष बाळु काटे यांचा कार्यकाळ संपल्याने रवींद्र शितोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.संस्थेचे जवळपास ८५० एवढे सभासद असून एकूण पन्नास कोटीच्या आसपास वार्षिक उलाढाल आहे.

स्वच्छ व पारदर्शक कारभार करत सभासदांचे हित जोपासण्यासाठी काम करणार असल्याचे मत नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र शितोळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.रविंद्र शितोळे यांच्या निवडीनंतर शिक्षक नेते आप्पासाहेब कुल,शांताराम जगताप,पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विकास शेलार तसेच शिक्षक संघाच्या पदाधिकारी यांनी उपस्थित राहुन संघटनेच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *