भोर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
वेळूफाटा येथील फिर्यादी बवून्तीदेवी विनोद महतो (रा.पार्वती,वंदन सोसायटी,फ्लॅट क्र.३०५ ) सध्या रा.वेळूफाटा ता.भोर,जि.पुणे ) यांचे घर दोन अज्ञान चोरट्यांनी बुलेटवर येत,घराचे लॉक तोडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मिळून तब्बल १ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.यासाठी ५० हुन अधिक सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून आरोपींचा शोध घेतला असता, संशयित आरोपी शशिकांत अनंत माने, वय.२५ ( रा.वेताळनगर मोरया हाऊसिंग सोसायटी, चिंचवड ) प्रणव सुरेश सिंग,वय. २५ ( रा.उरुळी कांचन ता.हवेली, जि.पुणे ) यांना ताब्यात घेतले असून,त्यांनी आपण हे गुन्हे केल्याचे कबुल केले असून,इतर तीन गुन्ह्यांची कबुली देखील दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,पुणे जिल्ह्यात घरफोड्यांचे प्रमाण वाढले असल्याने,या गुन्ह्यांचा तपास करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या भोर विभागाच्या पथकाला दिल्या होत्या.त्या अनुषंगाने तपास करीत असताना,वेळूफाटा येथील घरफोडी करताना,अज्ञात चोरटे हे बुलेटवर आल्याचे निदर्शनास आले,त्याच दिवशी शिंदेवाडी ( ता.भोर,जि. पुणे ) येथे देखील बुलेटवर येत दिवसा घरफोडी करण्याचा प्रयत्न केला होता,परंतु लोकांची चाहूल लागताच चोरट्यांनी पळ काढला होता.याच अनुषंगाने तपास करीत असताना आरोपींच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरचे सुमारे ५० हुन अधिक सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून आरोपींचा माग काढत असताना,या आरोपींना सातारा-पुणे हायवे वरून जात असताना बुलेट गाडीसह संशयित आरोपी शशिकांत माने व प्रणव सिंग याला ताब्यात घेतले असून,त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली देत,स्वामी नारायण मंदिर येथील सोसायटीमध्ये एक घर फोडी केल्याचे सांगितले आहे.या आरोपींवर राजगड पोलीस ठाण्यात दोन आणि भारती विद्यापीठ पुणे पोलीस ठाण्यात एक अशा तीन गुन्ह्यांची देखील स्थानिक गुन्हे शाखेने उकल केली आहे.आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाई कामी राजगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके,पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे,शिवाजी ननवरे,पोलीस हवालदार बाळासाहेब कारंडे,राजू मोमीन,अजय घुले, पोलीस नाईक अमोल शेडगे,बाळासाहेब खडके,पोलीस कर्मचारी मंगेश भगत,धीरज जाधव,चालक सहा. फौजदार मुकुंद कदम,दगडू वीरकर यांनी केलेली आहे.