Political Breaking : उपमुख्यमंत्री अजित पवारांची जीभ घसरली, आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत,अजित पवारांनी गोंधळ घालणाऱ्यांना सुनावले..!!


रायगड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

शिवनेरी येथे शिवजयंतीच्या सोहळ्यावेळी अजित पवारांचं भाषण सुरू असताना त्यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाची माहिती देण्यास सुरुवात केली,तसेच केंद्र सरकारने कायद्यात बदल केला आणि 50 टक्क्याहून अधिक आरक्षण देण्याची तरतूद केली तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल,असं अजित पवार म्हणाले,तेव्हा काही तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.दादा,५० टक्क्यांच्या आत आरक्षण द्या, असं हे तरुण म्हणाले.

त्यावर अजित पवार संतापत त्यांची जीभ घसरली आणि ते म्हणाले की,बाळासाहेब थोरात काय,दिलीप-वळसे पाटील आणि मी असेल, आम्हीही मराठ्यांच्या पोटचे आहोत. आम्हालाही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे.आरक्षण खोळंबून ठेवायला आम्हाला काय आनंद वाटतो का ? असा सवाल करतानाच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे.त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. काही कायद्याच्या अडचणी आहेत.त्यातून मार्ग काढूनच आम्ही पुढे जात आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना कडक शब्दांत झापले.

अजित पवारांनी गोंधळ घालणाऱ्या तरुणांना खडसावल्यानंतर लगेचचं जय शिवाजी,जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जयचा जयघोष झाला. त्यानंतर अजित पवारांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. यावेळी पवार म्हणाले की, या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.आमच्या जातीला,समाजाला आरक्षण न द्यायला आम्हाला काय आनंद आहे का ? शिवबाने काय शिकवलं ? महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली.ही गोष्ट मान्य करावी लागेल. भावनिक करू नका.आम्हाला कळत नाही का ? तरुण मुलांचं रक्त उसळतं असतं हे समजू शकतो,असं त्यांनी सांगितलं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *