Big Breaking : अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी तब्बल ३८ दोषींना फाशीची शिक्षा आणि ११ जणांना जन्मठेप..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

२६ जुलै २००८ ही तारिख अहमदाबादकरांच्या अंगावर शहारा आणते.अवघ्या ७० मिनिटांत २२ बॉम्बस्फोटांनी अहमदाबाद हादरलं होतं. स्फोटांमध्ये तब्बल ५६ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.२०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी एकूण २४ बॉम्ब लावले होते.पण त्यातल्या कलोल आणि नरोदामध्ये लावलेले बॉम्ब निकामी झाले.तब्बल १३ वर्ष न्यायालयात खटला सुरु होता अन् आज अखेर त्याचा निकाल लागला.न्यायालयानं ४९ पैकी ३८ दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.तर उर्वरित ११ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हरकत- उल- जिहाद-अल-इस्लामीनं या स्फोटांची जबाबदारी स्वीकारली होती.या स्फोटांनंतरही केरळ, राजस्थान,तामिळनाडू,पश्चिम बंगाल,नवी दिल्लीसह गुजरातम धील इतर शहरांमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमक्या येत राहिल्या.अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष न्यायालयानं ऐतिहासिक निकाल देत तब्बल ४९ दोषींना शिक्षा सुनावली आहे. त्यापैकी ३८ जणांना फाशी,तर ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुजरात मधील अहमदाबादमध्ये जुलै २००८ मध्ये साखळी बॉम्बस्फोट प्रकरण म्हणजे,अवघ्या देशासाठी काळा दिवस.२६ जुलै २००८ रोजी अहमदाबादमध्ये सर्व काही नेहमीप्रमाणे सुरु होतं.बाजार पेठांमध्ये लगबग सुरु होती,मात्र त्यानंतर सायंकाळी ६.४५ वाजता मणिनगर येथील गजबजलेल्या बाजारपेठेत अचानक स्फोट झाला.त्यानंतर ७० मिनिटांतच संपूर्ण अहमदाबाद हादरलं.

अहमदाबादमध्ये एक नाही,दोन नाही तर तब्बल २१ बॉम्बस्फोट झाले होते.सरकारी आकडेवारीनुसार,या बॉम्बस्फोटांमध्ये ५६ जणांनी आपला जीव गमवावा लागला होता आणि २०० हून अधिक लोक जखमी झाले होते.२००२ मध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीननं हे स्फोट घडवून आणले होते.मणिनगर हा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा विधानसभा मतदारसंघ होता.मणिनगरमधून दोन जिवंत बॉम्ब पोलिसांनी जप्त केले होते. तर मणिनगरमध्ये तीन ठिकाणी स्फोट झाले होते. 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *