Crime Breaking : लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार करून गर्भपात केल्याप्रकरणी शिवसेनेच्या मोठ्या नेत्यावर गुन्हा दाखल..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरीक संबंध प्रस्थापित करून तिला गरोदर केले.तसेच जबरदस्तीने गर्भपात करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनेचे उपनेते व भारतीय कामगार सेनेचे जनरल सेक्रेटरी रघुनाथ बबनराव कुचिक ( रा.येरवडा ) याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३७६,३१३,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका २४ वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, मॉडेल कॉलनीतील प्रबोधन फाऊंडेशन गोव्यातील बेलीझा बाय दी बीच हॉटेल,प्राईड हॉटेल येथे ६ नोव्हेंबर २०२० ते १० फेब्रुवारी २०२२२ या दरम्यान हा प्रकार घडला आहे.संशयित आरोपी रघुनाथ कुचिक हे कामगार क्षेत्रात कार्यरत असून शिवसेनेचे उपनेते आहेत.संशयित आरोपीने फिर्यादीसोबत प्रेमसंबंध निर्माण करुन लग्नाचे आमिष दाखवत, फिर्यादीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी शारीरीक संबंध प्रस्थापित केले.

त्यातून फिर्यादी गरोदर राहिल्या.तेव्हा त्यांची संमती नसताना जबरदस्तीने गर्भपात करुन तसेच या बद्दल कोणाला काही सांगितले तर तुला मारुन टाकील,अशा धमक्या दिल्या आहेत.तसेच फियार्दी यांची तब्येत ठीक नसताना फिर्यादीकडून समजूतीचे करारनाम्यावर सह्या करुन घेतली आहे.त्यामुळे कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील अधिक तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *