Political Breaking : संजय राऊत यांचा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर डोळा, नारायण राणे यांचा राऊतांवर घणाघाती आरोप..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीकेचा भडिमार केल्यानंतर आता भाजप नेत्यांनी आता राऊतां विरोधात जोरदार मोहीम आखली आहे.कालपासून भाजपच्या अनेक नेत्यांनी राऊतांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला असून,राऊतांना अनेक सवालही केले आहेत. अशातच एकेकाळी शिवसेनेची तोफ म्हणून ओळखले जाणारे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी देखील राऊतांवर टीका केली आहे.संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहे.त्यांनी राष्ट्रवादी कडून सुपारी घेतली आहे.संजय राऊत पूर्णपणे राष्ट्रवीदचे आहेत.असा घणाघाती आरोप राणेंनी केला आहे.

संजय राऊत हे लोकप्रभात असताना त्यांनी उद्धव आणि बाळासाहेब या दोघांवरही टीका करण्याचं सोडलं नव्हतं, तसेच बाळासाहेबांच्या आशीर्वादाने,उद्धव ठाकरेंच्या आशीर्वीदाने संजय राऊत संपादक,पत्रकार झालेत.त्या मानाने राऊतांची भाषा त्या गुणवत्तेची नाहीच,तो बेकारचे आरोप करतो.दोन दिवसांपासून राऊत हे अस्वस्थ का झाले ? काल पत्रकारपरिषदेत ते एवढे बेजाबदार का बोलत होते ? प्रवीण राऊतने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर त्यांचा तिळपापड झाला आहे. असा घणाघातही राणेंनी केला आहे.तसेच राऊतांच्या आरोपावर बोलताना,नारायण राणे म्हणाले की,तू पत्रकार आहेस,पुरावा दे तुझी जमीन, ५० एकर ५० लाखात घेतली आणि ते पैसे आणलेस कुठून ? त्यानंतर हा सुजीत पाटकर कोण ? त्याच्या कंपनीत तुझ्या मुली कशा डायरेक्टर असू शकतात,स्वत आधी उत्तरं दे,असे म्हणत राणेंनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

शिवसेना वाढवण्यासाठी नाहीय,याचं लक्ष्य उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर बसलेत ना तिथे आहे, हा अर्धा नाही पूर्ण राष्ट्रवादीचा आहे,जेव्हा उद्धव ठाकरे पवारांसोबत गेले,तेव्हा संजय राऊतच होते.तुझी कुंडली माझ्याकडे आहे.सगळी बाहेर काढून टाकेल,केलेल्या केसेसबद्दल, झालेल्या व्यवहाराबद्दल मला सगळं माहितीय, राऊतांबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी एवढं गप्प बसू नये, थोडी पुजा करावी,हे करायला पाहिजे हो, त्याशिवाय तोंड गप्प नाही होणार,असा इशाराही राणेंनी दिला आहे.राऊत हे कसे झोळी घेऊन फिरायचे हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय.तसेच राऊत हे पगारी नेते असून,ते ओव्हर टाईम करुन पैसे कमवतात.अशी घणाघाती टीका केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी केली आहे.त्यामुळे राजकारणात एक नवीन ट्विस्ट आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *