बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बारामती शहरामध्ये घरफोडी चोरीचे गुन्हे वाढले असता, त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना शेजारील जिल्हयातील आरोपींची माहिती घेत असताना,संशयित आरोपी लोकेश रावसाहेब सुतार, वय.२८ वर्षे, ( रा. लिंगनूर,ता.मिरज,जि.सांगली) कोल्हापूर येथील कळंबा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असून,तो अट्टल घरफोडी करणारा आरोपी असल्याने त्याला ताबा वॉरंटने ताब्यात घेतले आहे.त्याने आपला साथीदार संदिप यशवंत पाटील ( रा.लिंगनूर,ता.मिरज,जि.सांगली ) याच्यासह गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,बारामती शहरात घरफोडींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी तपासाचे आदेश डीपी असताना,त्याप्रमाणे एक पथक तयार करून गुन्हयाच्या अनुषंगाने तपस करीत असताना, कोल्हापूर येथील कळंबा जेलमध्ये असणारा संशयित आरोपी लोकेश सुतार हा अट्टल आरोपी असल्याची माहिती घेत, ताबा वॉरंटने त्याला बारामती शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे आधीक चौकशी तपास केला असता,या आरोपीने बारामती शहर पोलीस स्टेशन हद्यीमध्ये सर्व घरफोड्या ह्या दिवसा त्याचा साथीदार संदिप यशवंत पाटील ( रा. लिंगनूर,ता.मिरज,जि.सांगली ) याच्याबरोबर केल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपीच्या साथीदाराचा शोध सुरु आहे.आरोपीकडून विविध गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून,भा.द.वि कलम ४५४,४५७,३८० या गुन्हयातील दोन तोळे सोने अंदाजे ९०,००० किंमतीचे,दोन सोन्याच्या अंगठ्या २५,००० रुपये किंमतीच्या,कानातले सोन्याचे अंदाजे १२५०० किंमतीचे,तसेच भा.द.वि कलम ४५४, ३८० या गुन्ह्यातील पावणे तीन तोळ्यांचा सोन्याचा हार अंदाजे १ लाख १० हजार रुपये किंमतीचा,पाच ग्रॅम सोन्याच्या साखळीचे गंठण अंदाजे १ लाख ५० हजार रुपये किंमतीचे, सोन्याचे ३५ ग्रॅम वजनाचे गंठण अंदाजे १ लाख ४० हजारांचे, तसेच भा.द.वि कलम ४५४,३८० या गुन्ह्यातील सोन्याचा नेकलेस १४ ग्रॅम वजनाचा असा ५६००० रुपये किमतीचा,९ ग्रॅम वजनाचे कानातील फुलं अंदाजे ३४,२०० रुपये किंमतीचे,२७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण अंदाजे १,०२६०० रुपये किंमतीचे असा तब्बल सात लाख वीस हजार तीनशे रुपये किंमतीचा व १७७ ग्रॅम (१७ तोळे व ७ ग्रॅम ) सोन्याचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडीक,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, उमेश दांडिले,पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे,गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अंमलदार अभिजित कांबळे,संजय जाधव, रामचंद्र शिंदे,कल्याण खांडेकर, दशरथ कोळेकर,तुषार चव्हाण,बंडू कोठे,अंकुश दळवी, रणजित देवकर,दशरथ इंगोले,अजित राऊत यांनी केलेली आहे.
बातमी चौकट :
बारामतीकरांनी आपल्या घराला व फ्लॅटला मजबूत कुलुप लावावे,लोखंडी ग्रिल बसवून घ्या तसेच, घराजवळ अगर सोसायटीमध्ये सीसीटीव्ही बसवून घ्यावे.शक्यतो दागिने लॉकरमध्ये ठेवा कारण किमती वस्तूंची सुरक्षितता पाहणे हे धारकाचे प्रथम कर्तव्य आहे. नाहीतर मनस्ताप वाट्याला येतो. तरी बारामतीकरांनी खबरदारी घ्यावी.
पोलीस निरीक्षक ( सुनिल महाडिक )