बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुक्यातील लिमटेक गावातील लहान मुलाला दगडाने मारण्याची भाषा वापरून महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संशयित आरोपी विक्रांत मालोजीराव जाचक ( रा. लिमटेक,ता.बारामती,जि. पुणे ) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ५०४, ५०६,३४१,अनुसूचित जाती आणि जमाती ( अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियम १९८९ चे कलम ३(१),(r),(s),(y), तसेच नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५ चे कलम ७ (१)(d) नुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी तीस वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या सविस्तर महितीनुसार,
फिर्यादींचे भाऊ सचिन भोसले व विजय भोसले या दोघांनी धनाजी जाचक यांची १४ गुंठे जागा बारा फुटी रोडसह खरेदीखत करुन विकत घेतलेली आहे.परंतू,बारा फुटी रस्त्यामध्ये संशयित आरोपी विक्रांत जाचक याने बेकायदेशीर चार फुट रोडवर लोखंडी खांब रोवून रस्ता आडवून अतिक्रमण केलेले आहे.त्यावरुन त्यांचेत व आमचे भावामध्ये दोन वेळा वाद झाला होता.त्याचा राग जाचक याच्या मनामध्ये होता.तो फिर्यादींच्या घराकडे खुनशी नजरेने पाहत असायचा.परंतू फिर्यादी याकडे दुर्लक्ष करीत होतो.संशयित आरोपी जाचक हे ११/२/२०२२ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आले असता,फिर्यादींच्या भावाचा लहान मुलगा हा उघडल्यावर शौचालयास बसला होता.
त्यावेळी जाचक याने जुन्या वादाचा राग मनात धरून हाताचे बोट करुन फिर्यादींना जातीवाचक शिवीगाळ करून संडासला बसलेल्या मुलाला ये गाबड्या उठ नाहीतर तुला दगडाने मारीन असे म्हणाल्याने या भितीने तो पळून घरात निघून गेला.व फिर्यादींकडे बघत,इथून जर गेलास तुला व तुझ्या भावांना एक दिवस तरी माझ्या बंदुकीच्या गोळीची शिकार बनवेन.असे बोलत तुझे भाऊ रात्रीच्या वेळी भेटू दे त्यांची तुला मयतच पाहावी लागेल अशी धमकी दिली.हा प्रकार फिर्यादींच्या भावजयीने व बहिणीने पहिल्यानंतर जाचक यांना जाऊ द्या साहेब लहान बाळ आहे चुकला असेल माफ करा. असे म्हणाले असता संशयित आरोपीने त्यांनाही तुम्हीही जास्त पुढे येवू नका तुमचा सुद्धा मी काटा काढणार आहे अशी धमकी देवून सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक दिली.असे फिर्यादीत म्हणंटले आहे.