मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज…
गेल्या नऊ महिन्यांपासून पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या होत्या,परंतु आता पदोन्नत्यांचा मार्ग मोकळा झाला असून राज्यातील ८५० पोलीस उपनिरीक्षकांना महसुली संवर्गाची मागणी करण्यात आली आहे.यामहिन्या अखेरीस त्यांना पदोन्नती देण्यात येणार आहे.गेल्या आठवडय़ात राज्यातील ४६० सहायक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली होती.त्यामुळे राज्य पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षकांची पदे रिक्त झाली होती.गेल्या नऊ महिन्यांपासून राज्यातील पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या होत्या.सहायक निरीक्षकांच्या पदोन्नत्या होताच उपनिरीक्षकांच्या पदोन्नतीचाही मार्ग मोकळा होताच गृह विभागाकडून या आदेशाचे पत्र देण्यात आले.पदोन्नतीची यादी प्रकाशित करण्यात आली.
नागपूर पोलीस आयुक्तालयातील ४८ पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्य क सहायक निरीक्षकपदी तर नागपूर ग्रामीण पोलीस दलातील १७ पोलीस अधिकाऱ्यांचाही पदोन्नतीच्या यादीत समावेश आहेत. पदोन्नतीस पात्र पोलीस उपनिरीक्षकांना येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत महसूल संवर्ग द्यावा लागणार आहे. सर्वाधिक रिक्त जागा मुंबई शहरात असून ३९४ पोलीस अधिकारी पदोन्नतीने मुंबईत जाणार आहेत.तसेच ठाणे नवी मुंबई,मीरा भाईंदर- वसई-विरार, रायगड या शहरांचा समावेश कोकण दोन विभागात असून या शहरात एकूण ५९९ पोलीस अधिकारी पदोन्नतीने जाणार आहेत.