Political Breaking : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यानंतर एका शिवसेना खासदारांना १ वर्षाचा तुरुंगवास आणि पावणे दोन कोटीचा दंड..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

राज्य सरकारमधील शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनाही पालघर जिल्हा प्रथम वर्ग न्यायालयाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि १ कोटी ७५ लाख रुपये दंडाची शिक्षा दिली असून,जागेच्या व्यवहारातून राजेंद्र गावित यांनी व्यावसायिक चिराग किर्ती बाफना यांना दीड कोटीचे चेक दिले होते.मात्र,हे चेक बाऊन्स झाल्याने राजेंद्र गावितांच्या विरोधात पालघर न्यायालयात खासगी दावा दाखल केला होता.त्यानंतर आता राजेंद्र गावित यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *