पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
नातेवाईकांनी करणी केली आहे,त्यासाठी होमहवन बोकडाचा बळी देण्याबरोबरच अघोरी कृत्य करून एक महिलेची तब्बल ५० लाख ३० हजारांची फसवणूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. बाबाकडून पैसे मिळवून देतो असे सांगून दुसऱ्याने या महिलेशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.हा प्रकार सोमवार पेठ व गंजपेठेत २०१८ ते २०१९ दरम्यान घडला आहे.राजेंद्र बलराम कन्ना,वय.४५ ( रा.गंजपेठ ) मनीष बापूराव शिंदे,वय.४२ वर्षे ( रा.देहूरोड ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सोमवार पेठेत राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राजेंद्र कन्ना याने फिर्यादीच्या आईस नातेवाईकांनी करणी केली आहे,असे सांगून त्यांच्या आईला बरे करण्यासाठी कागदी चिठ्ठ्या तयार करून,काळी बाहुली,लिंबू हळद-कुंकू,लिक्वीड याचा वापर करून होमहवन केले.तसेच समशानभूमीत बोकडाचा बळी देणे यांसारखे जादूटोण्यासारखे अघोरी कृत्य केले.फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेळोवेळी ५० लाख ३० हजार रुपये घेतले.मात्र,त्याचा काहीही फायदा न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले.त्यावर मनीष शिंदे याने राजेंद्र कन्ना याच्याकडून पैसे घेऊन देतो,असे आमिष दाखवत त्यांच्यासोबत वेळोवेळी अश्लिल चाळे करून त्यांचा विनयभंग केला.त्यांनी हा प्रकार कोणाला न सांगण्याची व तक्रार न करण्याची धमकी दिली होती.त्यामुळे त्यांनी इतके दिवस तक्रार दिली नव्हती.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट तपास करीत आहेत.