महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून राळ उडवून दिली आहे. त्यातच ठाणे शहरात किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना नेते अनिल परब आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.किरीट सोमय्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा,असे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांनी केले होते.
त्यावरून किरीट सोमय्या म्हणाले की, किरीट सोमय्याकडे लाईफलाईन रुग्णालयाची नोंद नसल्याचे आणि वरळी कोविड सेंटरच्या घोटाळ्याचे पुरावे आहेत, त्यामुळे किरीट सोमय्याला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवायचे असे म्हणत आहेत.मात्र किरीट सोमय्याला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापेक्षा अनिल परब आणि संजय राऊत यांना जेलमध्ये कधी टाकणार ? असा सवा किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विचारला आहे.