Social News : झारगडवाडी जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रविण बोरकर यांची एकमताने निवड..


झारगडवाडी : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील पुणे जिल्हा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची मुदत संपल्याने हे पद रिक्त झाले होते. या रिक्त झालेल्या पदावर झारगडवाडीचे युवा नेते प्रविण गणपत बोरकर यांची एकमताने अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी मावळते अध्यक्ष आप्पासाहेब मासाळ प्रभारी मुख्याध्यापक धोंडिबा लाटे,शिक्षक वर्ग आणि पालक वर्ग उपस्थित होते.

गेली दोन वर्षांपासून कोरोना मुळे शाळा बंद होत्या यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र आता त्या पुन्हा पुरवत झाल्या आहेत.तसेच शाळेच्याबाबत असणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने पाठपुरावा करु तसेच निधींच्या माध्यमातून शाळेला मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रविण बोरकर यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *