Political Breaking : राज्याचे महिला बालविकास व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडूंना दोन महिन्याचा सश्रम कारावास पहा काय आहे नक्की कारण ?


अकोला : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवणे राज्यमंत्री बच्चू कडू यांना महागात पडलं असून,त्यांना चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने दोन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे.राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने शिक्षा आणि २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅटबाबतची माहिती लपवली होती.याबाबत चांदुर बाजार येथील भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी २०१७ मध्ये तक्रार नोंदवली होती.या प्रकरणाचा आज निकाल आला असून बच्चू कडू यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.बच्चू कडू यांच्याविरोधात लोकप्रतिनिधी कायदा कलम १२५ (अ) अनव्ये गुन्हा सिद्ध झाला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *