राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर १९ सुवर्ण आणि २१ रौप्य पदक मिळवल्याचा पराक्रम…
पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
पुणे ग्रामीण पोलिस दलात गेल्या १५ वर्षापासुन कार्यरत असणाऱ्या आणि स्थानिक गुन्हे शाखेत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या पोलीस अंमलदार अजय घुले यांच्या कामाची दखल घेत पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.नेमबाज़ी खेळांमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. नेमबाजीच्या अनेक स्पर्धेत त्यानी सुवर्ण पदक मिळवले आहे.पुणे ग्रामीण पोलिस दलात एक उत्कृष्ट नेमबाज म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.
मुंबई येथे पोलिस महासंचालक कार्यालय येथे सन – २०२० मध्ये झालेल्या नेमबाजी स्पर्धेत अजय घुले यांनी उत्कृष्ट नेमबाजी करुन सुवर्ण पदक मिळवले होते. कोरोनाच्या संकटामुळे बाक्षिस वितरण राहीले होते,याचे औचित्य साधत विशेष प्रावीण्य मिळवल्या बद्दल सुवर्ण पदक व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. आला.अजय घुले यांनी आतापर्यंत विविध स्पर्धेत राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर १९ सुवर्णपदक आणि २१ रौप्यपदक मिळवलेले असून,तब्बल ४० पदके आपल्या नावावर केलेली आहेत.
महाराष्ट्र टुडे लाईव्ह मुख्य संपादक : विकास कोकरे यांचेकडून…
अजय घुले यांना भावी वाटचालीस महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज चॅनेल कडून हार्दिक शुभेच्छा…