फलटण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
फलटण तालुक्यातील मठाचीवाडी येथील एकाला घरी जाऊन फायनान्स कंपनीचे हफ्ते वेळेवर का भरले नाहीत असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी करून माझ्याकडे एक लाख रुपये दे नाहीतर तुला सोडणार नाही असे म्हणत धक्काबुक्की करत मारहाण करणाऱ्या श्रेयी मटका इक्बीपमेंट फायनान्स लिमिटेड कंपनीच्या पुण्यातील अधिकारी संशयित आरोपी अरिंदम आचार्य पंकज गायकवाड व इतर दोन अनोळखी व्यक्तींवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३८५, ३४१,३४२,५०४, ५०६ (३४) अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अनिल जगन्नाथ शिंदे, वय.३२ वर्षे ( रा.मठाचीवाडी,ता.फलटण,जि. सातारा ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार,फिर्यादी शिंदे व त्यांचा मेव्हणा रमेश बुधनवर या दोघांनी पुण्याच्या श्रेयी इक्बीपमेंट फायनान्स लिमिटेड कंपनीकडून पोकलेन मशिनसाठी तब्बल ४२ लाख ५० हजार रुपये कर्ज घेतलेले होते, व त्यांनी आतापर्यत कर्जाचे १३ हप्ते भरलेले असून,कोविड परिस्थितीमुळे त्यांचे ७ हप्ते थकीत राहिले असून,दि.०९ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास श्रेयी इक्बीपमेंट फायनान्स कंपनीचे अधिकारी अरिंदम आचार्य,पंकज गायकवाड व त्यांच्या सोबत इतर दोन व्यक्ती मठाचीवाडी मध्ये असलेल्या फिर्यादींच्या घरी आले.मी घरासमोर उभा असताना त्यांनी मला कर्जाचे हफ्ते वेळेत का भरले नाही ? असे म्हणत मला शिवीगाळ व दमदाटी करु लागले.
यावेळी कंपनीचे अरिंदम आचार्य फिर्यादी शिंदे यांना म्हणाले की,तुमच्या नावचे कोर्टाचे वॉरन्ट असून, तुम्हाला आमच्या सोबत पुण्याला यावे लागेल.त्यावेळी फिर्यादी शिंदे त्यांना म्हणाले की,मी माझ्या गाडीवर येतो असे म्हणत शिंदे हे त्यांच्या सोबत जाण्यास निघाले.त्यावेळी फायन्सास कंपनीचा गायकवाड हे शिंदे यांच्या गाडीवर
पाठीमागे बसला.फायन्सास कंपनीच्या गाडीच्या पाठीमागुन फलटणच्या दिशेने जात असताना पिंप्रद येथील विठु माऊली पेट्रोल पंपाच्या थोडे पुढे काही अंतरावर पंढरपुर ते फलटण रोडवर जाताना आचार्य याने त्याची गाडी माझ्या गाडीला आडवी मारुन मला थांबवले.गाडीतून उतरत माझ्या पाठीमागे बसलेल्या फायनान्सच्या गायकवाड याला आचार्य याने माझ्या गाडीची चावी काढुन घेण्यास सांगितली. गायकवाड याने माझ्या गाडीची चावी काढुन घेतली.व शिंदे यांना त्यांच्या गाडीत बसविले.त्यानंतर गायकवाड याने फिर्यादींना एक लाख रुपये रुपये रोख दे नाहीतर तुला इथेच मारतो असे म्हणुन मला शिवीगाळ करत, त्यांच्यासोबत आलेल्या दोन अनोळकी इसमांनी त्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ केली.त्याठिकाणी फलटणहुन येणारे चुलते धोंडीराम शिंदे व त्यांच्या सोबत आलेल्या दोन व्यक्तीनी फिर्यादींची गाडी पाहुन थांबले.व माझी विचारपुस केली त्यावेळी त्यांना झालेला प्रकार सांगत असताना त्या सर्वांनी तेथून पळ काढला असे फिर्यादीने फिर्यादीत म्हणंटले आहे.