महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
भारताचा WWE या कुस्ती प्रकारातील भारतीय असणारा दलीप सिंह राणा उर्फ द ग्रेट खलीनं आपल्या राजकीय कारकिर्दीला आजपासून सुरुवात केलीय. पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यान भाजपाचा झेंडा हाती घेतलाय.केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा तो सदस्य झालाय.रेसलर द ग्रेट खलीनं आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी खलीला पक्षाचं सदस्यत्व मिळवून दिलं. मूळचा हिमाचल प्रदेशचा असलेल्या द ग्रेट खलीनं भाजपात प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान मोदींचं कौतुक केलंय.मोदींच्या रूपानं देशाला योग्य पंतप्रधान मिळाला असल्याचंही तो म्हणाला.
खली हा मूळचा हिमाचल प्रदेशचा असून,ते जालंधर येथे काॉन्टिनेन्टल रेसलींग अॅकडमी चालवतात.या अॅडकमीच्या माध्यमातून युवांना कुस्तीचं प्रशिक्षण देतात.खली राजकारणात प्रवेश करतील, अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. तसेच ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील ? याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.याआधी त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली होती.मात्र, काल त्यांनी केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी यांची भेट घेतली.ज्यामुळं खलींच्या भाजप प्रवेशाची शक्यता अधिक वाढली होती.आज अखेर त्यानं भाजपमध्ये प्रवेश केलाय.