या मागणीचे निवेदन बारामती सह पुर्ण राज्यभरातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
सम्यक विद्यार्थी आंदोलन ही विद्यार्थी संघटना शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्याला भेडसावणारे प्रश्न यांसाठी काम करणारी संघटना आहे.कर्नाटक मधील हिजाब विरोधी आंदोलन महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था विद्यापीठातुन पसरवून सामाजिक सौहर्दा बिघडवनारे समाजकंटक यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन बारामती प्रांतअधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.देशात विशेषतः ऊत्तर प्रदेशातील निवडणुकीत एका धर्मांध पक्षाला मतदान व्हावे म्हणून कर्नाटक मधील काही कॅालेजमध्ये हिजाब विरोधी आंदोलन करून शिक्षणाला हिंदू-मुस्लिम करणेचा प्रयत्न चालू आहे.
अल्पसंख्यांकांच्या वर्गाला टार्गेट करून त्यांच्या जीवन पध्दतीवर हल्ले करणेचा प्रयत्न काही धर्मांध शक्ती कडून केला जात असून,मुस्लिम समाजातील मुलींचे शिक्षणाचे प्रमाण कमी आहे.त्यांची शैक्षणिक स्थिती SC/ST वर्गापेक्षा कमी आहे.अशा स्थितीत गरिब मुस्लिम पालक मुलींना अल्पसंख्यांकांच्या संस्था असतील किंवा ईतर धर्मियांनी संस्थांनी चालविलेल्या संस्था असतील त्या ठिकाणी या मुली शिक्षण घेत आहेत.त्यांच्या जीवीताचे त्यांच्या अधिकाराचे संरक्षण करणेचे काम जिल्हाधिकारी यांचे वडील म्हणून आहे.म्हणून जिल्ह्यातील शैक्षणिक संकुलातील वातावरण दूषित होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाशी बोलून जिल्हयात शांतता व सौहार्द राहील याची चोख व्यवस्था ठेवणे हे जिल्हाधिकारी यांचे परमकर्तव्य आहे.
केरळ सारख्या राज्यांत मोठ्या प्रमाणावर मुस्लिम भगिनी त्यांच्या हिजाबमध्ये शिक्षण घेत असताना आंदोलन भाजप शासित राज्यातून सुरू होऊन ईतर राज्यांत जाणीवपूर्वक पसरविले जात आहे.त्याला राज्यांच्या सीमेवर थांबविणे हे शासन म्हणून सरकारचे काम आहे. ते सरकारने करावे आणि राज्यातील शांतता भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी. अशी मागणी यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने करण्यात आली.यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनचे बारामती तालुका अध्यक्ष रोहित भोसले,शहराध्यक्ष विनय दामोदरे, SVPM कॉलेज माळेगाव सदस्य सुरज घाडगे आदि पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.