बारामती वकील संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेबद्दल अँड.राजकिरण शिंदे यांचा सत्कार संपन्न..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

बारामती वकील संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेबद्दल अँड.राजकिरण शिंदे यांचा आज सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक बारामती येथे अभिनंदन व सत्कार करण्यात आला.यावेळी अँड.राजकिरण शिंदे बोलताना म्हणाले की सामाजिक जबाबदारी वाढली असून गोर-गरीब लोकांना न्याय मिळवून देण्याचा नेहमीच प्रयत्न राहिल.

कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे, गौरव अहिवळे,विजय सोनवणे,विकास कोकरे,शुभम गायवाड,संजय वाघमारे,अनिल मोरे,योगेश महाडिक, संदिप साबळे तसेच पत्रकार उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *