धाक दाखवून अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवायला लावून त्याचे व्हिडीओ देखील प्रसारित केले जात…
महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
सोलापुरात गावठी पिस्तूलाचा तसेच धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लोकांना नग्न करणाऱ्या आणि शेण खाऊ घालणाऱ्या विकृत टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून,ही टोळी लोकांना जीवे मारण्याची धमकी देऊन विवस्त्र करीत असे,सोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवायला लावून त्याचे व्हिडीओ रेकॉर्डही करीत असे एवढंच नाही तर ते व्हिडीओ आपसात शेअर देखील केले जात.लोकांना शेण खाऊ घालणे,हस्तमैथून करायला लावणे या गोष्टी ही टोळी सर्रास करत असे.या टोळीने विकृतीचा कळस गाठला होता अखेर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
या टोळीत संशयित आरोपी सागर कांबळे,वय.२२ वर्षे, बुद्धभूषण नागटिळक,वय.२६ वर्षे,सतीश गायकवाड वय.२५,अक्षय थोरात, वय.२६ वर्षे अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.तुळजापूर नाका ते रुपभवानी मंदिर या परिसरात ही टोळी आपली विकृत कृत्ये करीत असे.अखेर जोडभावी पेठ पोलिसांनी या सर्व विकृताना अटक करून भा.द.वि कलम २९२,५०६ (२),भारतीय हत्यार कलम कायदा ३,४,२५ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.तसेच गावठी पिस्टल धारधार शस्त्रे आणि ४ मोबाईल सह एकूण २ लाख २० हजारांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलेला आहे.अशी माहिती सोलापूरच्या डीसीपी वैशाली कडूकर यांनी दिलेली आहे.