दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
दौंड तालुक्यातील जास्त थकबाकी असणाऱ्या सहकारी विकास सेवा संस्थांची २०२१-२२ या आर्थिक वर्षातील बैठक नुकतीच घेण्यात आली. २०२१-२२ या आर्थिक वर्षात ज्या संस्थेच्या सभासदांची वसुली ८० टक्के पेक्षा कमी आहे.अशा संस्थांचा एनपीए आणि अनिष्ट तफावत वसुलीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
ही बैठक जिल्हा निबंधक मिलिंद सोबळे,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन सुनील चांदेरे,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मा.चेअरमन रमेश (आप्पा ) थोरात,कार्यकारी संचालक चव्हाण, तालुका उपनिबंधक तावरे तालुका विभागीय अधिकारी निलेश थोरात यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली.या बैठकीत थकीत सभासदांची १०१ (१) अन्वये कारवाई करण्यासाठी प्रकरणे दाखल करणे,यापूर्वी ज्यांच्यावर १०१ (१) नुसार कारवाई केली आहे,अशा सभासदांची वसुली प्रक्रिया चालू करणे,संस्थेचे संचालक मंडळ यांना थकबाकीदार सभासदांची वसुलीची जबाबदारी देणे.
वसुलीची कारवाई जलद गतीने राबवण्यासाठी वसुली अधिकाऱ्यांना तशा स्वरूपाच्या सक्त सूचना देण्यात आल्या.संस्थेचे चेअरमन व सचिव यांच्या वैयक्तिक आढावा जिल्हा निबंधक साबळे यांनी सकाळी अकरा ते सात वेळेस बैठकी घेतला.तसेच बँकेचे नूतन व्हाईस चेअरमन सुनील चांदेरे साहेब यांचा सत्कार रमेश थोरात यांच्या वतीने करण्यात आला.