बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
घरासमोरून उसाचा ट्रॅक्टर घेऊन जात असताना, घरातील विजेच्या कनेक्शन वायर येत असल्याने, वायर उचलून ट्रॅक्टर घेऊन जा असे म्हणल्याचा राग मनात धरून बारामती तालुक्यातील पारवडी गावातील एकाला लोखंडी गजाने मारहाण करणाऱ्या संशयित आरोपी सतीश रामचंद्र गावडे,दादा रामचंद्र गावडे,रामचंद्र गोविंद गावडे सर्वजण ( रा. पारवडी,ता.बारामती,जि.पुणे ) या तिघांवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३२४,५०४,५०६ (३४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी संपत हौशीराम नांगरे वय.५५ वर्षे ( रा.पारवडी, ता.बारामती,जि.पुणे ) यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, संशयित आरोपींचा उसाचा ट्रॅक्टर हा फिर्यादी नांगरे यांच्या घरासमोरून जात असताना,फिर्यादींनी आरोपींना ट्रॅक्टर घेऊन जाताना माझ्या घराच्या विजेची वायर खाली आहे,ती बाजूला घेऊन तुमचा ट्रॅक्टर घेऊन जावा असे म्हणंटले असता,संशयित आरोपी दादा गावडे व रामचंद्र गावडे यांनी फिर्यादींना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.दोघांनी नांगरे यांना धरून झालेल्या प्रकाराचा राग मनात धरून त्यांच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहाण केली,त्यावेळी नांगरे यांनी आरडा ओरड करण्यास सुरुवात केली, त्यानंतर नांगरे यांचा मुलगा धावत आल्याने त्या तिघांनी तेथून पळ काढला.गजाने मारहाण झाल्याने फिर्यादींच्या डोक्यातून रक्तस्त्रव होत असल्याने त्यांना दवाखान्यात नेण्यात आले,असे फिर्यादीत फिर्यादींनी म्हणतले आहे.याबाबत आधीक तपास तालुका पोलीस करीत आहेत.