Malegaon News : माळेगाव कारखाना ऊस नेत नसल्याच्या वादातून सभासदाने कार्यकारी संचालकांच्या समोर अंगावर रॉकेल घेतले ओतून..!!


माळेगाव : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यात ऊस नेत नसल्याच्या वादातून एका सभासदाने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.समीर शहाजी धुमाळ ( रा. धुमाळवाडी,ता.बारामती ) असे रॉकेल ओतून घेतलेल्या सभासदाचे नाव आहे.या सभासदाने कारखान्याचे कार्यकारी संचालकांच्या कक्षात अंगावर राॅकेल ओतून घेतल्याचा प्रकार सोमवारी भरदुपारी घडला.दरम्यान रॉकेल ओतून घेतल्यावर तातडीने त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

मात्र अशा अचानक घडलेल्या घटनेने प्रशासनाची मोठी कसरत झाली होती.ऊसतोडणी रखडल्याने समीर यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.जमिनीच्या वादामुळे कारखाना ऊस तोडून आणण्यास नकार देत आहे. तुम्हीच तुमचा ऊस तोडून कारखान्याला घेवून या,असे कारखान्याकडून सांगितले जात होते.भावा-भावांचा जमिनीचा असल्याची पोलीस प्रशासनाकडून आणि कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *