Crime News : पूर्ववैमनस्यातून तरुणांवर कोयत्याने वार ; इंदापूर पोलीस ठाण्यात सात जणांसह तीन अज्ञातांवर गुन्हा दाखल..!!


इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

इंदापूर तालुक्यातील गोंदी गावातील तरुणावर पूर्वी झालेल्या भांडणाचा कारणावरून सात जणांनी आणि तीन अज्ञातांनी मिळून तरुणाला रस्त्यावर थांबवून त्याच्यावर कोयत्याने वार केले.लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.ही घटना शनिवारी ( दि.५ ) रात्री साडे सातच्या सुमारास गोंदी गावातील मेन चौकात घडली आहे.याप्रकरणी जखमी विलास श्रीरंग जाधव,वय. ४४ वर्षे ( रा.गोंदी,ता.इंदापूर, जि. पुणे ) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार अमित उर्फ बाबू सुळ,विलास महादेव सुळ,सोमनाथ पोपट सुळ,विद्यासागर दशरथ वाघमोडे,पोपट विठ्ठल वाघमोडे, अर्जुन पोपट वाघमोडे,विजय अनिल सुळ ( सर्वजण रा.गोंदी,ता.इंदापूर ) त्यांच्यासह त्यांच्या तीन अज्ञात साथीदारांविरोधात भा.द.वि कलम १८६० चे कलम १४३,१४७,३०७,३२४,३२३,५०४५०६ ,१४८,१४९ शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम २५,४ नुसार इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या मित्रासोबत शनिवारी रात्री साडे सातच्या सुमारास गोंदी गावातील मित्र रणजित वाघमोडे याच्याशी बोलून गावातील विक्रम सुळ याचे लग्न असल्याने सुळ बरोबर गावातील देवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले असता, दर्शन घेऊन जात असताना आरोपी अमित सुळ त्यांच्या हातात चाकू घेऊन विलास सुळ याच्या हातात लोखंडी कोयता, सोमनाथ सुळ याच्या हातात लोखंडी कोयता,विद्यासागर वाघमोडे याच्या हातात लाकडी काठी व पोपट वाघमोडे,अर्जुन वाघमोडे,विजय सुळ व अनोळखी तिघेजण हे जवळ आज तुमचा ट्रॅक्टर अडवल्याबाबत पोलिसांना तक्रार देणार होतात,असे म्हणत यांना आज जिवंत सोडायचे नाही म्हणत त्यांच्या हातातील लोखंडी कोयत्याने वार केला.

फिर्यादींनी हात आडवा लावल्याने मधल्या बोटावर गंभीर दुखापत झाली,तसेच इतर आरोपींनी चाकूच्या व हातातील काठीने फिर्यादींना दुखापत केली व इतर अनोळखी इसमांनी लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने मला वाचवा म्हणून आरडा ओरड केल्याने गावातील लोक जमा झाल्याने सर्वजण पळून जाताना दोन दिवसात तुझा काटा काढतो अशी धमकी देत पळून गेले. त्यानंतर फिर्यादींच्या नातेवाईकांनी अकलूज येथे अश्विनी हॉस्पिटल येथे त्यांना ऍडमिट केले.आरोपींनी जुन्या गोष्टींचा राग मनात धरून पूर्व वैमनस्यातुन कोयत्याने चाकूने,काठ्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला असे फिर्यादीने फिर्यादीत महंटले आहे.याबाबत इंदापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *