महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळविहरे गाव आणि भोंगळेवस्ती येथून काही दिवसांपूर्वी गाई चोरीस गेल्याबाबत जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून संशयित आरोपी शुभम बाळू जगताप,वय.१९ वर्षे ( रा.शिवरी, ता.पुरंदर,जि.पुणे ) याला ताब्यात घेतले असून त्याने त्याचा साथीदार हरिभाऊ दळवी ( रा.नाझरे,ता. पुरंदर,जि.पुणे ) यांच्या मदतीने गायी चोरल्याचे तपासात सांगितले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे व भोंगळे वस्ती येथील गायी चोरीस गेल्याबाबत जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सासवड जेजुरी पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की,कोळविहरे व भोंगळे वस्ती येथून गाई शुभम जगताप याने चोरल्याची माहिती मिळाली,त्यावरून शुभम हा जेजुरी येथे येणार असल्याचे समजले असता, त्याठिकाणी सापळा रचत त्याला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत,अधिक चौकशी केली असता,त्याने त्याचा साथीदार हरिभाऊ दळवी याच्या मदतीने गायी चोरून नेल्याचे सांगितले,त्यातील एक गाई जवळर्जुन येथे विक्री केल्याचे सांगितले.तर एक गाई बारामती येथे जनावर बाजारात विकली असल्याचे सांगितले.त्यावरून जवळर्जुन येथून एक गाई ताब्यात घेण्यात आली.या आरोपीने मित्रासोबत भोंगळे वस्ती येथील घरफोडी करून एक एलइडी टीव्ही चोरी केल्याचे तपासात कबूल केले आहे.संशयित आरोपीला पुढील तपासासाठी जेजुरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,पोलिस उपअधिक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार बाळासाहेब कारंडे,अजय घुले,विजय कांचन, पोलीस कर्मचारी धिरज जाधव यांनी केलेली आहे.