Crime Breaking : ग्रामीण पोलिसांचा जुगार क्लबवर छापा,साडे चार लाखांच्या साहित्यांसह ५ जण ताब्यात व इतर ४ ते ५ जण फरार…कुणाच्या आशीर्वादानं सुरु होता हा जुगार क्लब ?


कारवाईत ६ मोटारसायकली,५ टेबल,२५ खुर्च्या व ८ स्टूल केले जप्त…

महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे,उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात ऑल आऊट ऑपरेशन राबवत असताना फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाडळी येथील जुगार क्लबवर छापा मारत क्लब चालक माऊली शिवरकर ( रा.फलटण,जि. सातारा ) व मालक सनी काकडे ( रा.फलटण,जि.सातारा ) याच्यासह संशयित आरोपी सुनील मोतीराम पवार,वय.४० वर्षे ( रा.बुधवार पेठ,फलटण ) जमन तारो पंडित,वय.३२ वर्षे ( रा.येरवडा सादलबाबा,दर्ग्या जवळ पुणे ),योगेश यशवंत खरात,वय.३४ वर्षे ( रा.पणदरे,ता बारामती ), अतिष सुभाष साळवे, वय.२४ वर्षे ( रा.पणदरे,ता.बारामती,जि. पुणे ),सोमनाथ सिताराम घनवट,वय.३९ वर्षे ( रा.जाधव वाडी,ता.फलटण ) सर्जेराव दादा माने ( रा.पाडळी,ता. फलटण,जि.सातारा ) यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४,५ भा.द.वि कलम २६९,२७०,मो.वा. कायदा कलम ३ (१)/,१८१,१३०,१७७, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ११, साथीचे रोग कायदा कलम ३,४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सातारा जिल्हा ऑल आऊट ऑपरेशन रावबवत असताना,फलटण ग्रामीण हद्दीत भाडळी या ठिकाणी जुगार क्लब चालू असल्याची माहिती मिळाली असता,फलटण ग्रामीण पोलिसांनी जुगार क्लबवर छापा टाकत तब्बल ४ लाख ३७ हजार ९४० रुपयांच साहित्य जप्त करण्यात आलं आहे.हा जुगार क्लब माऊली शिवरकर व चालक सनी काकडे हे चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.या कारवाईत ५ संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून,इतर ४ ते ५ आरोपी अद्यापही फरार आहेत.या कारवाईत आतापर्यंत एकूण ६ दुचाकी यांच्यासह मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शनिवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.येत्या काळात पोलिसांकडून फलटण ग्रामीण हद्दीतील अवैध जुगार अड्ड्यांवर कारवाईची मोहीमच हाती घेतली जाण्याची शक्यता आहे.

कारवाईत काय काय जप्त ?

या जुगार क्लबवर छापा टाकून पोलिसांनी एकूण ४ लाख ३७ ९४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या छाप्यात पोलिसांनी ६ दुचाकी वाहने जप्त केली असून यासोबत पोलिसांनी ५ टेबल ,२५ खुर्च्या व ८ स्टूल अस जुगाराचं साहित्यही हस्तगत केलं आहे.

कारवाईत कोणा कोणाचा सहभाग…

ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल,अप्पर पोलीस अधीक्षक अजितकुमार बोराडे,उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग बेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलीस उपनिरीक्षक एस.व्ही.अरगडे,पोलीस नाईक जगदाळे,पोलीस कर्मचारी अवघडे, गायकवाड,पठाडे यांनी केलेली आहे.याबाबत अधिक तपास फलटण ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक एस.व्ही.अरगडे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *