बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
बारामती तालुक्यातील कऱ्हावागज मध्ये दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्यांनी घराची कुलूपं तोडून २५ ते ३० तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारण्याची घटना घडली असून,शनिवारी दुपारी दोन वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.तालुका पोलिसांनी या प्रकरणात तपासाला सुरुवात केली आहे.बारामती तालुक्यातील कऱ्हावागज गावातील मच्छिंद्र बनकर आणि गोरख बनकर हे भाऊ शेजारी राहतात.घरातील सर्व लोक शेतात काम करण्यास गेली होती.मच्छिंद्र बनकर घरी होते,मात्र दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मेंढ्याना चारा आणण्यासाठी ते रानात गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील १५ तोळे दागिन्यांवर चोरांनी डल्ला मारला आहे.
त्यांच्या घरासमोरच राहणारे गोरख बनकर यांच्या देखील घराचे कुलूप तोडून राणीहार,सोनसाखळी गंठण, अंगठ्या,अशा तब्बल १८ तोळे सोन्यावर देखील डल्ला मारला असून, मच्छिंद्र जानकर यांचे दोघांचे मिळून जवळपास २५ ते ३० तोळे सोन्याचे दागिने दरोडेखोरांनी आहेत.दोघेही बंधू टेलिफोन खात्यातून निवृत्त झाले आहेत.त्यामुळे मिळालेल्या पैशातून त्यांनी सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक केली होती.हे दागिने बनकर कुटुंबाने घरातल्या लग्नकार्यासाठी तयार केले होते. बारामती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या सहाय्याने पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.