शासकीय बातमी : पुणे वन विभागात वन संरक्षणासाठी तीन वाहने दाखल..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वन विभागासाठी घेण्यात आलेल्या तीन वाहनांना विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.या वाहनांचा वापर वन तथा वन्यजीव संरक्षणासाठी करण्यात येणार असून वाहनांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करण्यात आला आहे.यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव,जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, उपवनसंरक्षक राहुल पाटील उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *