Crime News : खंडोबानगर येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद..!!


पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…

सासवड पोलिस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हा वाघापूर चौकात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना सासवड शहरात पेट्रोलिंग करीत असताना मिळाली असता,स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचत संशयित आरोपी विलास विनोद सोळंकी, वय.१८ वर्षे (रा. खंडोबानगर,ता.पुरंदर,जि.पुणे ) याला ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता, या गुन्ह्यात त्याच्या सोबत सहभागी असलेल्या एका विधी संघर्शीत बालकाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक सासवड शहरात पेट्रोलिंग करीत असताना, गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सासवड पोलिस ठाण्यातील भा.द.वि कलम ३९४ (३४) या गुन्ह्यातील दोन आरोपी फरार असून,ते दोघे वाघापूर चौकात येणार असल्याची माहिती मिळाली असता,स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत दोघांना ताब्यात घेतले असता,त्यात विलास सोळंकी व त्याच्या सोबत या गुन्ह्यात सहभागी असलेल्या एका विधी संघर्शीत मुलास ताब्यात घेतले असून,तपासासाठी या आरोपींना सासवड पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी भोर धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे,पोलीस हवालदार बाळासाहेब कारंडे, अजय घुले,विजय कांचन,धिरज जाधव यांनी केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *