बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल सातारा या ठिकाणी बंडातात्या कराडकर यांनी अकलेचे तारे तोडत दारू विषयावरून अपमानकारक अपशब्द वापरल्याबद्दल बारामती बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बंडातात्या कराडकर यांच्या पुतळ्याचे दहन करून व जोडे मारून तीव्र शब्दांत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.निषेधानंतर बंडातात्या कराडकर यांच्यावर कायदेशीररीत्या गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी.
याकरिता बारामती शहर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर यांना तक्रारीचे निवेदन देण्यात आले.यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पुणे जिल्हा समाज कल्याण दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य साधू बल्लाळ,बारामती तालुका विद्युत वितरण नियंत्रण समितीचे अध्यक्ष ॲड. रवींद्र माने,बारामती तालुका सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे,बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा वनिता बनकर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अनिता गायकवाड बारामती शहर युवती राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा आरती शेंडगे, तालुका सोशल मीडियाचे उपाध्यक्ष पैगंबर शेख,सुधाकर माने,दिपाली पवार,पुष्पा देवकाते आदींसह तालुका व शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.