सातारा : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीच्या विरोधात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं,यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर म्हणाले,राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात याचे पुरावे देखील आहेत.. सुप्रिया सुळे या दारू पिऊन रस्त्यावर पडलेले आणि नाचतानाचे फोटो देखील आहेत.हे शोधले तर सापडेल असे बंडातात्यांनी खळबळजनक आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ढवळा असून अजित पवार पोवळा असल्याची सडकून टीका यावेळी बंडातात्यांनी केली आहे..