पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती तालुक्यातील मुर्टी येथील नीरा मोरगाव रोडवर असलेल्या टाटा इंडिकॅश कंपनीचे एटीएम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबतचा गुन्हा वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दाखल असून,त्या अनुषंगाने तपास करीत असताना एटीएम चोरीतील संशयित आरोपी बनवरीलाल उर्फ राजू मोहनलाल मीना,वय.३४ वर्षे ( रा.कोरेगाव, ता.शिरूर,जि.पुणे ) मूळ रा.पाचार,ता. दातारामगड,जि.सिखर,राज्य.राजस्थान ) बाबूलाल उर्फ पप्पू गोपाळ चौधरी,वय.३० वर्षे ( सध्या रा.कारेगाव रॉयल हॉटेल,ता.शिरूर,जि.पुणे ) मूळ रा.करड,ता. दातारामगड,जि.सिखर,राज्य.राजस्थान ) यांना ताब्यात घेत यांच्याकडून वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे,पारनेर पोलीस ठाणे तोफखाना पोलीस ठाणे,श्रीगोंदा पोलीस ठाणे,अहमदनगर पोलीस ठाणे एमआयडीसी या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आले आहेत.
याबाबत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या अधिक माहितीनुसार,बारामती तालुक्यातील मुर्टी गावातील इंडीकॅश बँकेचे एटीएम फोडून तब्बल चार लाख अकरा हजारांची चोरी झाल्याबाबत गुन्हा दाखल झाला असून,त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा तपास करीत असताना,त्या मागावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करताना बोलेरो गाडीचा वापर करत,ही गाडी शिरूर या ठिकाणची असल्याचे निदर्शनास आले असता,अधिक तपास केला असता,या वाहनांतून आरोपी कोरेगाव या ठिकाणी येत असल्याची माहिती घेत,मोठ्या शिताफीने सापळा रचत आरोपींना वाहनासह ताब्यात घेण्यात आले.पोलिसी खाक्या दाखवताच बोलेरो गाडीचा वापर करत त्यांनी पारनेर येथील एटीएम,तसेच पिकअप गाडीचा वापर करत, मनमाड रोडवरील एटीएम मशीन तसेच लोणी परिसरातील पिकअप गाडीचा वापर करत तेथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात कबूल केले.या आरोपींकडून तब्बल पाच गुन्हे उघडकीस आले आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके,सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येळे,सचिन काळे,वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे,पोलिस उपनिरीक्षक श्रीगणेश कवितके सहाय्यक फौजदार तुषार पंधारे, पोलीस अंमलदार रविराज कोकरे जनार्दन शेळके,राजू मोमीन,अजित भुजबळ,अभिजित एकशिंगे,मंगेश थीगळे,स्वप्नील अहिवळे,पोलीस नाईक योगेश नागरगोजे,वडगाव निंबाळकरचे अमोल भूजबळ यांनी केलेली आहे.